Home गडचिरोली महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा!

महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा!

0
265

महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा!

संघटनेचा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा

संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री महोयाना निवेदन

 

सुखसागर झाडे

महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागाचा महत्वपूर्ण महसुल सेवक (कोतवाल) कणा आहे. महसूल विभागातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची महसूल खात्याचे विविध शासकीय धोरणे उपाययोजना, शासन स्तरापासुन ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरु असणाऱ्या महत्वाच्या योजना इत्यादींची अमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंत, व्यवस्थित रित्या पोहचवण्यासाठी. राज्यातील महसूल यंत्रणा, मा. जिल्हाधिकारी ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते. महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा. सर्वात प्रमुख विभाग आहे. महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्र देणे. कृषी गटांना शासनाच्या विविध योजना, अभियान मोहिमांचे समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका राजशिष्टाचार, विविध जात प्रमाणपत्रे देणे अशा अनेक बिगर महसुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते. त्याअर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांची निगडित असलेला. आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे.

क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) २४ तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरिता पार पाडत असतो. परंतु शासनाने अद्यापर्यंत महसूल सेवक (कोतवाल) पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्या प्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे. महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक (कोतवाल) यांना इतर महसूल कर्मचाऱ्या प्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांचा वरील अन्याय दूर करावा. या करिता मा. तहसीलदार चामोर्शी यांच्या कडे महसूल सेवक (कोतवाल) संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनावर योग्य ती अमलबजावणी न झाल्यास अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महसूल सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर डि. साखरे , उपाध्यक्ष राकेश वाडगुरे सचिव माणिक कोडापे व इतर पदाधिकारी आणि महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!