Home चंद्रपूर वंचित बहुजन आघाडी – चंद्रपूर महानगर बैठक संपन्न

वंचित बहुजन आघाडी – चंद्रपूर महानगर बैठक संपन्न

0
139

वंचित बहुजन आघाडी – चंद्रपूर महानगर बैठक संपन्न

 

चंद्रपूर, ८ सप्टें. :- काल रविवार रोजी दुपारी प्रकाश नगर महाकाली कॉलरी वार्ड, येथे शंकर चापडे यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी – चंद्रपूर महानगर तर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत प्रभागातील स्थानिक समस्या, संघटनात्मक बांधणी तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्याचबरोबर संघटनात्मक कामकाज व इतर विविध विषयांवरही सविस्तर विचार विनिमय करण्यात आला.

महासचिव सारंग सहारे, उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञाशिल सहारे, कोषाध्यक्ष मिथुन काटकर, उपाध्यक्ष हरीश इंदूरकर, उपाध्यक्ष संघपाल सरकते, संघटक शंकर चापडे, सहसचिव सुभाषचंद्र ढोलणे, सुभाष थोरात, विक्रम बोरकर, चंद्रप्रभा रामटेके, सविता दुर्गे, राधा वाघमारे, शोभा वाघमारे, बबिता मेश्राम, ललिता दुर्गे, आशा रामटेके, सरिता दुर्गे, सूरज चंद्रगिरवार आदी मान्यवरांसह या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहपूर्वक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!