Home चंद्रपूर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश – जिल्हा परिषद मुख्य अभियंता पुन्हा रंगेहात

भ्रष्टाचाराचा पर्दाफाश – जिल्हा परिषद मुख्य अभियंता पुन्हा रंगेहात

0
916

भ्रष्टाचाराचा पर्दाफाश – जिल्हा परिषद मुख्य अभियंता पुन्हा रंगेहात

चंद्रपूर, ६ सप्टें. :- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मुख्य अभियंता विवेक फेडे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

या व्हिडिओमध्ये फेडे हे स्वतःच्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये 20,000 रुपये स्वीकारताना स्पष्टपणे दिसत आहेत. एवढेच नाही, तर पैसे स्वीकारल्यानंतर ते समोरील व्यक्तीला विचारतात – “किती आहे?” यावर समोरील व्यक्ती सांगतो – “20 आहे.” यानंतर भेंडे उर्वरित पैशांची मागणी करतात. त्यावर समोरील व्यक्ती “लवकरच उर्वरित पैसे आणतो” असे आश्वासन देताना ऐकू येतो.

ही घटना केवळ लाच स्वीकारण्यापुरती मर्यादित नाही तर उर्वरित लाचेची मागणी झाल्याचे ठोस पुरावे यातून समोर आले आहेत.

आधीही आले होते आरोप – राजकीय पाठबळामुळे वाचले?

महत्वाचे म्हणजे, विवेक भेंडे यांना काही महिन्यांपूर्वीच भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते. परंतु स्थानिक सत्ताधारी आमदाराच्या राजकीय आशीर्वादामुळे ते पुन्हा सेवेत रुजू झाले, अशी माहिती जनतेमध्ये चर्चेत आहे.

यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की –
👉 भ्रष्टाचार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्यामुळे त्यांचे मनोबल अधिक वाढत आहे का?
👉 जिल्हा परिषदेच्या कामकाजातील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेवर जनतेचा विश्वास राहणार कसा?

आम आदमी पक्षाची ठाम भूमिका

आम आदमी पार्टी, चंद्रपूर जिल्हा या प्रकरणाचा तीव्र निषेध करते. हा व्हिडिओ म्हणजे भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण असून, यामध्ये कायदेशीर पातळीवर तात्काळ कारवाई होणे अत्यावश्यक आहे.

आम आदमी पक्षाच्या ठाम मागण्या :

1. विवेक फेडे यांना तात्काळ निलंबित करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशी सुरू करावी.

2. या प्रकरणातील सर्व पुरावे जतन करून गुन्हा दाखल करण्यात यावा.

3. राजकीय आश्रय घेऊन पुन्हा सेवेत आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी.

4. भ्रष्टाचारात दोषी आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा देऊन जनतेसमोर आदर्श उदाहरण ठेवावे.

5 जिल्हाधिकारी साहेबांना वरील व्हिडिओ व्हाट्सअप द्वारे पाठविण्यात आला असून तक्रार नोंदवण्यात आलेली आहे

जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांची प्रतिक्रिया
“जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही कधीही सहन करणार नाही. भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकीय लोक आता जनतेसमोर उघडे पडले आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषद ही जनतेसाठी विकासकामे करण्यासाठी आहे, पण येथे अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी एकत्र येऊन जनतेच्या पैशांची लूट करत आहेत. हा व्हिडिओ त्याचाच पुरावा आहे. आता जनता याला माफ करणार नाही.”

जनतेला आवाहन

चंद्रपूरकरांनो, भ्रष्टाचार हा आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने प्रश्न विचारला, जबाबदारीची मागणी केली, तरच खरी बदल घडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!