Home चंद्रपूर घुग्घुस येथे नंदीबैल सजावट स्पर्धा थाटात संपन्न

घुग्घुस येथे नंदीबैल सजावट स्पर्धा थाटात संपन्न

0
341

घुग्घुस येथे नंदीबैल सजावट स्पर्धा थाटात संपन्न

नव्या पिढीला सर्जाराजा प्रती कृतज्ञता रहावी म्हणून तान्हा पोळा उत्सव – विवेक बोढे

घुग्घुस: तान्हा पोळा, गणपती, दुर्गा उत्सव आयोजन समितीतर्फे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी गांधी चौकात नंदीबैल सजावट स्पर्धा पार पडली. सलग ७ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी उपस्थित होते.

सामाजिक संदेश देणारी सजावट करणे अनिवार्य ठेवण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम पारितोषिक २००१, द्वितीय १५०१, तृतीय १००१ तसेच २०० प्रोत्साहनपर पारितोषिके ठेवण्यात आले होते.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम पारितोषिक अंश कोयाडवार, द्वितीय ज्ञानवी सावे, तृतीय अंशुल दांडवे यांना देण्यात आला. २१९ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, नव्या पिढीला सर्जाराजा प्रती कृतज्ञता राहावी म्हणून तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात येतो.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपा नेते विवेक (गुड्डू) तिवारी, जिल्हा सचिव विनोद चौधरी, चिन्नाजी नलभोगा, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीनिवास गोसकूला, आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश कुटेमाटे, प्रमोद भोस्कर, सिनू इसारप, दिनेश बांगडे, संजय भोंगळे, मानस सिंग, धनराज पारखी, प्रदीप जोगी, अण्णा कदम, श्रीकांत सावे, दीपक जैस्वाल, अनुप जोगी, दिलीप कांबळे, तुलसीदास ढवस, पियुष भोंगळे, उमेश दडमल, अनिल नित, विनोद जंजर्ला, राकेश भेदोडकर, रज्जाक शेख, योगेश घोडके, गजानन जोगी, प्रवीण ठाकरे, राहुल ढेंगळे, निखिल अतकारे, गौरव ठाकरे, प्रणय बोकडे, गणेश राजुरकर, मंगेश राजुरकर, प्रणय मुक्के, हेमंत कुमार, शंकर सिद्दम, विक्की निभ्रड, रवी घोडके, सचिन नांदे वमशी महाकाली, शुभम थेरे, आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!