उद्या रविवारला राजुरा येथे नवोदय परिक्षा मार्गदर्शन शिबिर…
राजुरा |:| जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसणाऱ्या खाजगी अनुदानित शाळा आणि इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील हिंदी, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय तालुकास्तरीय नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर रविवार (दि. १७) रोजी सकाळी १० वाजता ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सावन चालखुरे, प्रमुख अतिथी राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, प्रा. इर्शाद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रम ओळख, प्रश्नपत्रिका स्वरूप आणि गणितातील सोप्या पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळांमधील हिंदी, मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.







