Home चंद्रपूर लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; घुग्घूस परिसरातील २२ तरुण जेसीबी प्रशिक्षणासाठी...

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; घुग्घूस परिसरातील २२ तरुण जेसीबी प्रशिक्षणासाठी छिंदवाडा येथे रवाना

0
65

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; घुग्घूस परिसरातील २२ तरुण जेसीबी प्रशिक्षणासाठी छिंदवाडा येथे रवाना

कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना रोजगाराची नवी दिशा

घुग्घूस : घुग्घूस परिसरातील ग्रामीण तरुणांच्या भविष्यास नवी दिशा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे. कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देत फाऊंडेशनतर्फे परिसरातील २२ तरुणांना ‘जेसीबी बॅकहो लोडर ऑपरेटर’ (JCB Backhoe Loader Operator) या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील नामांकित CII (Confederation of Indian Industry) स्किल ट्रेनिंग सेंटर येथे रवाना करण्यात आले.
ग्रामीण भागातील अनेक तरुण आर्थिक परिस्थिती व योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे केवळ मजुरीपुरतेच मर्यादित राहतात. मात्र, लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनने CSR अंतर्गत पुढाकार घेत या तरुणांना आधुनिक तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रशिक्षणामुळे तरुणांना खाणकाम, बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रात कुशल ऑपरेटर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घुग्घूस परिसरातील धानोरा, ऊसगाव, नकोडा,म्हातारदेवी,मुरसा, शेणगाव गावांमधून २२ उत्साही तरुणांची निवड करण्यात आली आहे.
छिंदवाडा येथील CII स्किल ट्रेनिंग सेंटर हे देशातील अग्रगण्य प्रशिक्षण केंद्रांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी या तरुणांना केवळ जेसीबी चालवण्याचे (Operating) प्रशिक्षण दिले जाणार नाही, तर मशिनची देखभाल (Maintenance) आणि सुरक्षिततेचे नियम यावरही तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सखोल मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल, ज्यामुळे त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची कवाडे खुली होणार आहेत.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. प्रशिक्षणासाठी रवाना होताना तरुणांच्या चेहऱ्यावर भविष्याबद्दल आशावाद आणि काहीतरी मोठे करण्याची जिद्द स्पष्टपणे दिसून येत होती.
“लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनमुळे आम्हाला दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. हे प्रशिक्षण आमच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामुळे आम्हाला चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतील,” अशी भावना प्रशिक्षणार्थी तरुणांनी व्यक्त केली.
ग्रामीण युवकांना सक्षम करून त्यांना स्वावलंबन याकडे नेण्याच्या दिशेने लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा हा उपक्रम निश्चित समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!