Home चंद्रपूर पत्रकार संजय भोकरे यांना तात्काळ ‘झेड +’ दर्जाची सुरक्षा देऊन कटातील मुख्य...

पत्रकार संजय भोकरे यांना तात्काळ ‘झेड +’ दर्जाची सुरक्षा देऊन कटातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करा

0
24

पत्रकार संजय भोकरे यांना तात्काळ ‘झेड +’ दर्जाची सुरक्षा देऊन कटातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करा

 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मुख्यमंत्री यांना मागणी 

 

घुग्घूस :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक तथा सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याची घटना अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे.

 

या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे व धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच आरोपी काही महिन्यांपासून श्री. भोकरे यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जातात. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार व सर्वसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारचे कट व हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुढील मागण्या आहेत

 

१) श्री. संजय भोकरे यांना तात्काळ ‘झेड +’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी.

२) या कटामागील मुख्य सूत्रधार व आर्थिक पाठबळ देणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी.

३) पत्रकारांच्या सुरक्षेसाठी राज्यस्तरावर विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यात यावी.

४) पत्रकारांवरील धमक्या व हल्ल्यांच्या घटनांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पत्राद्वारे करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!