Home चंद्रपूर घुग्घूस शहरातील उन्हाची भीषणता लक्षात घेता सर्व विद्यालय व शाळा सकाळी 11...

घुग्घूस शहरातील उन्हाची भीषणता लक्षात घेता सर्व विद्यालय व शाळा सकाळी 11 वाजता बंद करा

0
18

घुग्घूस शहरातील उन्हाची भीषणता लक्षात घेता सर्व विद्यालय व शाळा सकाळी 11 वाजता बंद करा

शासकीय आदेशाची अंमलाबजावणी करा – नप घुग्घूस अध्यक्ष – उपाध्यक्ष यांची सर्व शाळांना सूचना

घुग्घूस : हा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात प्रमुख औद्योगिक शहर असून एप्रिल महिन्यात शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली असून पारा 43 ते 44 डिग्री पर्यंत पोहचला आहे
शहरातील काही शाळा दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान सोडण्यात येत आहे यावेळेस उन्हाचा प्रचंड तडाखा असतो मुलांना उष्माघात होण्याची शक्यता आहे.
कुठल्याही विद्यार्थ्यांचे जिव धोक्यात येऊ नये करीता घुग्घूस शहरातील सर्वच शाळा व महाविद्यालयाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशाचे पालन करावे व सर्व शाळा व विद्यालय सकाळी 07 ते 11 वाजता पर्यंतच घेण्यात यावे शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत बदल करावे व या बदला संदर्भात पालकांना सूचित करावे अश्या सूचना नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी, नगरसेविका पल्लवी घुले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!