Home गडचिरोली शेतकऱ्यांच्या विरोद्धाला झुगारत कडेकोट बंदोबस्तात भुसंपादन प्रकिया सुरु

शेतकऱ्यांच्या विरोद्धाला झुगारत कडेकोट बंदोबस्तात भुसंपादन प्रकिया सुरु

0
302

शेतकऱ्यांच्या विरोद्धाला झुगारत कडेकोट बंदोबस्तात भुसंपादन प्रकिया सुरु

चामोर्शी, सुखसागर झाडे :- शेतकऱ्यांचा भुसंपादनाला विरोध असतानाही कडेकोट बंदोबस्तात चामोर्शी तालुक्यातील मुधोली , जयरामपुर परीसरात लॉयल्ड मेटल्स लिमिटेड कंपनी च्या लोहखनिज उद्योग प्रकल्पासाठी जमीन मोजणी सुरु आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून, त्यांच्याशी संवाद साधून कोणताही निर्णय होणे अपेक्षित असताना मात्र इथे शेतकऱ्यांना बळजबरीचा अनुभव येत आहे.

सुपीक जमिनी कवडीमोल दरात जबरीने अधिग्रहित करून भूमिहीन केले जात असताना शेतकऱ्यांचा वाली कुणीही नाही, हे चित्र वेदनादायी आहे. जमिन मोजणी करताना शेतकऱ्यांनी विरोध केला, प्रशासनाला विरोध दर्शवण्याचा आटापिटा सुरु होता परंतु त्यांचे म्हणणे गाऱ्हाने ऐकून समजून घेणारा वाली कोणी नसल्याने शेतकरी बंधू भगिनी मोठी खंत व्यक्त करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!