Home गडचिरोली एनएमएमएस परीक्षेत विश्वशांती विद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

एनएमएमएस परीक्षेत विश्वशांती विद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

0
117

एनएमएमएस परीक्षेत विश्वशांती विद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

चामोर्शी, सुखसागर झाडे :- तालुक्यातील भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय च्या विदयार्थ्यांनी नुकत्याच डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या NMMS (नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप) परीक्षेत आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कु. फाल्गुनी रतिलाल नायबनकर 78 गुण, वेद लोमेज झाडे 74 गुण, चांदणी चंदु दुर्ग 78 गुण, लोकेश भाऊराव कोडापे 63 गुण, प्रतीक प्रतापचंद्र कोटांगले 68 गुण, त्रिवेणी ऋषी लंबुवार 77 गुण, आर्यन तुळशीदास कुळसंगे 68 गुण, क्षितिजा किशोर भगत 86 गुण घेऊन उत्तीर्ण झाले.
घवघवीत यश घेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक अरुण राऊत व पर्यवेक्षक संतोष सुरावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!