Home गडचिरोली दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू ; आत्महत्या की अन्य कारण..? कोजबी...

दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू ; आत्महत्या की अन्य कारण..? कोजबी गावात हळहळ…

0
324

दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू ; आत्महत्या की अन्य कारण..? कोजबी गावात हळहळ…

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
आरमोरी तालुक्यातील कोचबी येथे चौथीतील एका विद्यार्थ्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. कोचबी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेणारा संस्कार विनोद कन्नाके (वय १० वर्षे) हा बालक आपल्या राहत्या घरी गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला.

प्राप्त माहितीनुसार, संस्कारचे आई-वडील पोटाची खडगी भरण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याने संस्कार एकटाच राहत होता. रविवारी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच कोचबीच्या पोलीस पाटील माधुरी सहारे यांनी तात्काळ आरमोरी पोलीस ठाण्याला कळविले. माहिती मिळताच आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, हा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला की यामागे काही अन्य कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. एवढ्या लहान वयातील बालकाने टोकाचे पाऊल उचलणे अनेक प्रश्न निर्माण करणारे असल्याने पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

या घटनेमुळे कोचबी गावात शोककळा पसरली असून, चिमुकल्या संस्कारच्या अकाली मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!