Home गडचिरोली मार्कंडा जत्रा 15 तारखेला, मात्र रस्त्याच्या कामाची दुरुस्ती कासवगतीने

मार्कंडा जत्रा 15 तारखेला, मात्र रस्त्याच्या कामाची दुरुस्ती कासवगतीने

0
199

मार्कंडा जत्रा 15 तारखेला, मात्र रस्त्याच्या कामाची दुरुस्ती कासवगतीने

 

चामोर्शी (मार्कंडा), सुखसागर झाडे :- विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्य लाखो भाविक भक्त देव दर्शनासाठी येतात मात्र, गतवर्षी यां यात्रेवर रस्ते विकास महामंडळा चा संथ गतीच्या कामाचे सावट पसरले आहे.
महाशिवरात्र अवघ्या दोन हफ्त्यावर येऊन पोहचली असतानाही रस्ते आणि नाल्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे भाविकांची सुरक्षा आणि किरकोळ व्यावसायिक व्यापारी यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मार्कंडा येथे दरवर्षी राज्यासह परराज्यातूनही हजारो भाविक आणि शेकडो व्यापारी येतात.
अनेक व्यापारी 15 दिवसा आधी पासूनच आपली दुकानें थाटत असतात. परंतु यावर्षी अशा रस्त्यांच्या अवस्थेमुळे नाली व रस्ता याचा समतोल बिघडल्यामुळे पादचारी व व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

कामाची संथ गती : कंत्राटदाराकडून मनमानी कारभार सुरु असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
कामाचे कोणतेही वेळापत्रक नाही, पर्यायी रस्ता उपलब्ध करून नं देणे यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. कंत्राटदाराच्या या असल्या मुजोरीला प्रशासनाकडून अभय आहे का? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केला तर यात्रे दरम्यान मोठे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून प्रशासनानी दखल घेण्याची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!