लोहखनिज वाहतूक करणारी वाहने ओव्हरलोड व भरधाव वेगाने जात असताना वाहतूक यंत्रणा गप्प का?
लोकशाही तुन राजेशाही कडे वाटचाल होतं आहे काय जनसामान्य नागरिकांना पडलाय गहन प्रश्न
चामोर्शी:- सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक च्या अपघाताची वाढती संख्या सध्या चिंतेचा विषय बनली आहे.
ही वाहने ओव्हरलोड भरधाव सुसाट वेगाने धावत असल्याने कित्येक नागरिक या ट्रकखाली चिरडले गेले… पण कारवाई शून्य याला कारणही तसेच आहे कारण वाहतूक यंत्रणा जिल्हयातील प्रशासन यांच्यावर मेहेरबान आहे. ट्रकने कितीही अपघात केले तरी आमचे कुणीहीं काही करु शकत नाही असा आत्मविश्वास ट्रक चालकात निर्माण झाला आहे.
कारण संपूर्ण यंत्रणेची विशेष कृपादृष्टी यांच्यावर आहे.
गडचिरोली- चामोर्शी -आष्टी – आलापल्ली मार्गांवर तर ही वाहने अक्षरशः दुचाकी चारचाकी वाहनाप्रमाने ओव्हरटेक करतात.. दुचाकी, चारचाकी वाहनावर कारवाई करणारी यंत्रणा मात्र ही वाहने कीतीही सुसाट वेगाने आणि ओव्हरलोड गेली तरी प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नाही.
उलट या वाहनाने अपघात झाल्यास लवकरात लवकर परिस्थिती कशी निवळेल यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागते.
गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गांवर आज लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कॉर्पिओ व एस टी बसला धडक दिली.
सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.. मात्र या ट्रकांच्या वेगावर नियंत्रण न आणल्यास कित्येक नागरिक याट्रक खाली चीरडण्याची भिती जनसामान्य नागरिकांत निर्माण झाली आहे.









