Home गडचिरोली माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

0
91

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

एटापल्ली/सुखसागर झाडे
तालुक्यातील दिंडवी गावात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिभा फुले समिती तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यकामाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व महापुरुषांचे पूजन केले.
या कार्यक्रमाचे उदघाटक माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दिलीप कोटरंगे हे तर प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, सत्य बळीराज निकाडे, आबाजी जेंगठे, शामलाताई मडावी, विकास आतला, प्रशांत आत्राम, योगेश कुमरे, दयाराम उसेंडी, महाजन उसेंडी, सुरेश उसेंडी, देविदास मोहूर्ले, कोशिक आवडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या दिंडवी गावात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या वेळी मार्गदर्शन करताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांच्या शोषण विरुद्ध आणि त्यांना समान संधी, अधिकार मिळवून देण्यासाठी सावित्री बाई फुले यांनी स्वतःला वाहून घेतले होते.

प्रस्थापित जात्यांध शक्तीचा विरोध पत्करून महिलांना शिक्षणाची संधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपलब्ध करून दिल्याचे गौरोदगार राजे साहेबांनी काढले. स्त्री शिक्षण, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवत समाजपरिवर्तनाचा मार्ग त्यांनी दाखवून दिला. त्यांचे विचार व कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव दिशादर्शक ठरत राहतील असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, त्याकाळात मुलींना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती.अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून स्त्रीयांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांना जोडलं.पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलांची पहिली शाळा सुरू केली.त्यानंतर चार वर्षातच एकोणविस शाळा सुरू करून भारताच्या प्रथम मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी प्राप्त केला.१८५२ मध्ये उत्कृष्ठ शिक्षिका म्हणून सन्मान ही करण्यात केला.एवढा उत्तुंग कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे होते.
त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन समाज पुढे करण्यास पुढाकार घ्यावा. असे मत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!