भेंडाळा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
आधारभूत धान खरेदी केंद्र कार्यान्वित झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा
चामोर्शी:सुखसागर झाडे
चामोर्शी तालुका खरेदी विक्री संस्था, चामोर्शीमार्फत भेंडाळा येते आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ ग्रामपंचायत सरपंच तथा संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी कुंदा जुवारे यांचे हस्ते संपन्न झाले.
भेंडाळा या मध्यवर्ती ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे परिसरातील जवळपास 14 गावातील शेतकऱ्यांना आपले धान विकणे सोयीचे होणार आहे. दूरवर विक्रीस नेण्याचा प्रचंड होणारा शेतकऱ्यांचा नाहक त्रास व वाहतूक खर्चात देखील बचत होणार आहे.
त्यामुळे भेंडाळा परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस खरेदी केंद्रात आणावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जुवारे यांनी केले आहे.
या उद्घाटन प्रसंगी सरपंच तथा कृषि उत्त्पन बाजार समिती संचालिका कुंदा जुवारे, ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव डांगे, गीता तुंबडे, ज्ञानेश्वर जुवारे, चंदू भाकरे, योगेश चलाख, खरेदी विक्री संस्था चे व्यवस्थापक नरेश घेर, श्यामराव वालदे, सुधीर धुडसे उपस्थित होते.









