कढोली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
श्वेता ठरली एशियन युथ पॅरा गेम्स मध्ये सुवर्ण पदकाची मानकरी
चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी तालुक्यातील कढोली गावातील कु. श्वेता भास्कर कोवे एका गरीब कुटुंबातील कन्येने अतुलनीय पराक्रम गाजवला व सुवर्ण पदक जिंकत भारत देशासोबतचं आपल्या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
श्वेता भास्कर कोवे हि महात्मा जोतिबा फुले वरिष्ठ महाविद्यालय आष्टी ची विद्यार्थींनी असुन डॉ. प्रा. कोरडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या दुबई एशियन युथ पॅरा गेम्समध्ये चमकदार कामगिरी बजावित देशाचे नाव रोशन केले आहे.
या श्वेता कोवे च्या झंझावाती कामगिरी बद्दल महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयच्या वतीने तथा परिसरातील नागरिकांकडून तिच्या यशाचे गुणगान व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









