Home गडचिरोली चातगाव पोलीस मदत केंद्राला पोलीस स्टेशन चा मिळाला दर्जा

चातगाव पोलीस मदत केंद्राला पोलीस स्टेशन चा मिळाला दर्जा

0
127

चातगाव पोलीस मदत केंद्राला पोलीस स्टेशन चा मिळाला दर्जा

गडचिरोली पोलिस विभागाचे महत्त्वाचे पाऊल

 

गडचिरोली : सुखसागर झाडे

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित विचाराधीन असलेल्या धानोरा तालुक्यातील चातगाव पोलीस मदत केंद्राला पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाला असून आज दि. 14/11/2025 रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या शुभहस्ते नव्या पोलीस स्टेशन चातगावचे उद्घाटन पार पडले.

2010 मध्ये स्थापन झालेल्या मदत केंद्राचे आता पोलीस स्टेशनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. पोेलीस स्टेशन चातगाव अंतर्गत 26 गावे जोडली जाणार आहे. त्यामुळे या हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारी आणि माओवादी कारवायांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, नागरिकांना तात्काळ मदत आणि सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी है अतिशय महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सोयीस्कर होणार आहे.

नवीन पोलीस स्टेशनमुळे पोलीस–नागरिक संवाद वाढून या परिसरात सुरक्षिततेची नवी ताकद निर्माण होणार आहे.
असे मत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!