Home गडचिरोली पक्षाच्या नात्यापेक्षा रक्ताच्या नात्याचा पगडा झाला भारी

पक्षाच्या नात्यापेक्षा रक्ताच्या नात्याचा पगडा झाला भारी

0
170

पक्षाच्या नात्यापेक्षा रक्ताच्या नात्याचा पगडा झाला भारी

चामोर्शी तालुक्यात भावा- भावाचं हृदयस्पर्शी राजकारण, मोठ्या भावाच्या उमेदवारीसाठी लहान भावाने दिला चक्कं पदाचाचं राजीनामा

नोमेश जुवारे
नरेंद्र जुवारे

चामोर्शी, सुखसागर झाडे 

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा-मुरखळा जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाचे उमेदवार नरेंद्र जुवारे यांच्यामुळे एक हृदयस्पर्शी राजकीय प्रसंग घडला आहे.
नरेंद्र जुवारे यांचे लहान भाऊ नोमेश जुवारे, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चामोर्शी तालुकाध्यक्ष होते.
नोमेश जुवारे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाकडून जिल्हा परिषद भेंडाळा-मुरखळा क्षेत्रातून उमेदवारी करीता रणशिंग फुंकले होते. व तसेच क्षेत्रात आपल्या नावाचा डंका वाजविला होता.
परंतु त्यांचे पितृतुल्य मोठे बंधू विरोधी पक्षातून निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांनी चक्कं आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा मोठ्या मनाने राजीनामा दिला आहे.
पदासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी राजकारणामध्ये अनेक कुटुंब विभक्त झालेले आपण पाहिलेले आहे.
खुर्चीसाठी कोणत्याही थराला माणसे जात असतात. सखे भाऊ पक्के वैरी होताना दिसतात परंतु हे भावा- भावाचे नाते राजकारणातील एक वेगळे उदाहरण असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
या प्रसंगावर नोमेश जुवारे यांचेशी बोलले असता, भावापेक्षा पक्ष आणि पद मोठे नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!