Home गडचिरोली झुंजार नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता भरत घेर यांचे ग्राम विकास आणि MIDC भूसंपादनावर...

झुंजार नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता भरत घेर यांचे ग्राम विकास आणि MIDC भूसंपादनावर मार्गदर्शन

0
576

झुंजार नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता भरत घेर यांचे ग्राम विकास आणि MIDC भूसंपादनावर मार्गदर्शन

दिपावली उत्सवाच्या निमित्ताने “हा खेळ नशिबांचा” या नाट्य उद्घाटन समारंभातुन जनतेला केले संबोधन

 

चामोर्शी : मौजा नवेगाव माल येथे नुकतेच दीपावली सणा निमित्य ‘हा खेळ नशिबाचा’ या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
सणासुदीच्या निमित्ताने ग्रामीण भागात दरवर्षी प्रमाणे यंदाही मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून, नाट्य हौसीच्या आग्रहास्तव नाटक प्रयोगाचे आयोजन चामोर्शी तालुक्यातील नवेगांव माल येथे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ता भरत घेर (भेंडाला – मुरखळा क्षेत्र) यांनी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शविली होती.
​कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चरदास पाटील चौधरी (उपसरपंच तथा सेवा सहकारी अध्यक्ष, नवेगाव माल) यांनी भूषवले. यावेळी इतर सन्माननीय मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना भरत घेर यांनी ग्राम विकासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी विशेषतः आरोग्य, शिक्षण, उपजीविका, युवक आणि महिला सक्षमीकरण तसेच शेती विकास यासारख्या मूलभूत विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले.
​सध्या चर्चेत असलेल्या MIDC प्रकल्पासाठी 14 गावांच्या जमीन अधिग्रहणाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवरही त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. भविष्यकाळात या संदर्भाने शेतकरी बांधवांना मोठे जनआंदोलन उभे करण्याची वेळ आल्यास सर्वांनी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी गावांमध्ये ग्रामसभा आणि जनजागृतीचे माध्यम वापरून व्यापक तयारी करण्याचे मार्गदर्शन त्यांनी समस्त ग्रामवासियांना केले. याप्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!