चामोर्शी येथील मुख्य अर्धवट रस्त्याला पक्का काँक्रिटरस्त्यात रुपांतरित कधी करणार
त्रस्त जनतेने उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन सादर करुन -जनसामान्यांचा थेट प्रशासनास सवाल
चामोर्शी, सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी तहसील म्हणून चामोर्शी ला ओळखल्या जाते. त्यात पेसा कायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात खासदार व आमदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रतिनिधींवत्व करीत असून नागरीकांना विकासात्मक धोरणातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. नागरिकांना विविध अत्यावश्यक सुख सुविधांपासून वंचित ठेवल्या जात आहे.
महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी चे सरकार असून फक्त गडचिरोली जिल्ह्यासाठी विकासाच्या नावाखाली नगरविकास विभागाकडून नगरपंचायत ला मोठा निधी येत असतो. परंतु प्रत्यक्ष विकास मात्र शून्य! चामोर्शी ही मोठी नगरपंचायत असून नगरविकासाच्या नावाने मोठा निधी नगरपंचायत ला मिळतो.
नगरपंचायत प्रशासन कडून ज्या वेगानं विकास व्हायला हवा तो होत नसुन ज्या जोराने विकास कामे होऊन चामोर्शी शहराचा चेहरा-मोहरा बदलायला हवा परंतु अस न होता काही वर्षांपासून विकास खुंटत असल्याचे नागरिक यांच्यात कुजबुज चर्चा ऐकायला मिळतो आहे. विकासाकडे प्रशासनाचे मुद्दामही लक्ष्य नाही.
विविध टॅक्सच्या नावावर लोकांकडून विविध कर वसुल केला जातो. स्थानिक नागरीकांना मात्र सुख सुविधांपासून वंचित राहावे लागते. कमीत कमी मुख्य मार्गावर काॅंक्रेट चे पक्के रस्ते नाही,पार्किंग नाही,लहान मुलांना साजेसं मनोरंजन,करमणूकी करीता गार्डन नाही. विद्यार्थी वर्गानां सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही,नाल्या चे बांधकाम पूर्ण नाही अशा विविध समस्येला लोकांना सामोरे जावे लागत आहे.
जे जनसामान्यांचे मुलभुत हक्क आहेत .नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मिळायला हवे परंतु मिळत नसून सुविधांपासून वंचित आहेत.
घोट मुख्य मार्ग ते(मा.उपविभागीय अधिकारी कार्यालय) समोरुन चामोर्शी शहरात जाणाऱ्या मार्गाची (राजमाता निवासी विद्यालय) पर्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर शेकडो वाहने आगामन करीत असतात. या मार्गावर बहुतांश बाहेर गावातील नागरीक, विधार्थी, तसेच शेकडो मजदूर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस_रात्र तालुका मुख्यालयाला येत जात असताना बरेच किरकोळ अपघात झाले आहे.
आठवडी बाजाराच्या दिवशी तर या मार्गाने प्रचंड गर्दी उसळली असते अशा वेळी प्रवास करताना जिव मुठीत घेऊन आवागमन करावे लागते. अशा वेळी जर अचानक होणाऱ्या आपत्तीस जबाबदार कोण, त्यांचा वाली कोण असा सवाल प्रशासनाला विचारला गेला आहे.
नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत न्याय हक्क मागण्या करिता स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठत स्थानिक शेकडो नागरीकांनी सहीनिशी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
याावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. डिम्पल उंदिरवाडे, शिवराम बारसागडे, नागेश पेशेटीवार,रमेश नैताम, सोमनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.









