शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथे स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती अभियान
स्वच्छता व प्लास्टिक अभियानातुन जनसामान्य नागरीकांना जनजागृती करीत दिला मोलाचा संदेश
चामोर्शी, सुखसागर झाडे
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शी द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथे दिनांक 01 आक्टोंबर 2025 ला राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्वच्छता हीच सेवा या पंधरवड्याचे औचित्य साधत चामोर्शी येथील (जुने हत्तीगेट) परीसरातील महात्मा गांधी उद्यान,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व गौतम बुद्ध यांच्या स्मारकाजवळील परिसरात स्वच्छता करुन नागरीकांना स्वच्छतेचा संदेश दिला व प्लास्टिक मुक्ती अभियान बाबत जनजागृती करीत सदर मोहीम राबवण्यात आली. या कार्यक्रमाचे नेतृत्व महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी अर्चना मडावी , श्रुती सोनटक्के व तेजस्विनी चितळे यांनी गटानुसार स्वच्छता मोहीम अभियानाचं उत्कृष्टरीत्या नेतृत्व करून स्वच्छता मोहीम यशस्वी राबवली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व राष्ट्रीय स्वयंसेविका तसेच प्राध्यापक व प्राध्यापक उत्तर कर्मचारी उपस्थित होते.









