Home गडचिरोली गडचिरोली औद्योगिकीकरण जिल्हा म्हणून घोषणा करावी!

गडचिरोली औद्योगिकीकरण जिल्हा म्हणून घोषणा करावी!

0
317

गडचिरोली औद्योगिकीकरण जिल्हा म्हणून घोषणा करावी!

आम आदमी पार्टीचे जेष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे यांची मागणी

 

गडचिरोली अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड तसेच चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लायल्ड मेटल कँपनी अंतर्गत लोह खनिज प्रकल्प सुरू करण्यात आले असून
व्यक्तिगत रीत्या चौकशी केली असता निदर्शनास असे आले आहे की 80 % स्थानिक लोकांना, युवकांना प्रकल्पात रोजगार मिळाला आहे तेथील कामगारांच्या पाल्यांना मोफत दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जात आहे आरोग्याच्या मोफ़त सुविधा दिल्या जात आहेत मोफत प्रवाशाची सुविधा केली आहे अश्याप्रकारे जिल्ह्याचा विकास होत असून रोजगार च्या संधी प्राप्त झाल्या असून आर्थिक परिस्थिती सक्षम होत आहे
कम्पनी स्तरावर स्थानीक युवकांना इतर विदेशात दर्जेदार प्रशिक्षण पूर्ण करून काम दिले जात आहे झपाटय़ाने प्रकल्पाचा विस्तार होत आहे अनेक विकासात्मक बाबीवर निर्णय घेणे सुरू आहे तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी शहरात वृक्ष लागवड करून सौंदरीकरण करण्यात येत आहे तसेच आजू बाजुच्या परिसरात वृक्ष लागवड केली जात आहे अशाप्रकारे गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिकीकरण व जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा जिल्हा अशी ओळख अख्खा महाराष्ट्रात नव्हे तर देशात ओळखल्या जात आहे औद्योगिकीकरण जिल्हा म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषणा करावी असे निवेदन मा जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर मागणी आम आदमी पार्टीचे नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी केली आहे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन सादर करताना संतोष कोटकर,जाणिकरावजी ननावरे,केशवजी सातपुते,दिवाकरजी साखरे, नामदेवजी पोले,खेमदेव हस्ते,भास्कर इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!