ग्रामपंचायत विक्रमपुर येथे गाव विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांची अफरातफर
सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या ग्रामस्थांनी केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
चामोर्शी, सुखसागर झाडे :- ग्रामपंचायत विक्रमपूर येथे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगमताने काम न करता लाखोंचा भ्रष्टाचार केला गेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात विक्रमपूर ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट ला ग्रामसभा आयोजित केली असून कामाचा आढावा घेत असताना 15 व्या वित्त आयोगानुसार कामाचे बिल कागदोपत्री दाखवून काम न करता लाखोंची अफरातफर व भ्रष्टाचार करण्यात आला, असे ग्रामस्थांचे आरोप आहेत, त्यात सरपंच सरकार, ग्रामपंचायत अधिकारी बर्डे, कर्मचारी संगमताने हा भ्रष्टाचार करण्यात आला असा आरोप विक्रमपूर ग्रामस्थांनी केला आहे,
विक्रमपूर येथे बंगाली समाज बांधवांचे गाव आहे. केंद्र व राज्य सरकार कडून लाखोंचा निधी ग्रामपंचायत ला गावाच्या विकास कामासाठी मिळतो परंतु गावाचा विकास हा कित्येक वर्षापासून झाला नसून सदर गाव हे विकासा पासून कोसोदुर गाव आहे. विकास कामाच्या नावाने सदर निधीचा गैरवापर केला असून सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वार्थ साधून गावाचा विकास न करता स्वतःचा विकास केला यात सरपंच, सचिव व कर्मचारी संगमताने कामे केल्याचं आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यात ब्लीचिंग खरेदी, सॅनिटरी पॅड, पाईप लाईन, झाडे तोडणे, मुरूम टाकणे, कौशल्य विकास प्रशिक्षण, कॉम्प्युटर training, सोलर highmast बसवणे, डस्ट बिन, वॉटर atm, मोबाईल द्वारे नळ, पाणीपुरवठा योजना तसेच 26 जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम या सारख्या विविध योजनावर खर्च दाखवून बिल कागदोपत्री दाखवून काम न करता लाखोंचा भ्रष्टाचार व अफरातफर केल्याचं आरोप विक्रमपूर ग्रामस्थांनी केला.
सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी सदर अफरातफर केलेली रोख रक्कम वसुली करून भांदवी कलमान्वये दंडात्मक गुन्हा नोंदविण्यात यावा. अशी विक्रमपूर ग्रामस्थांची मागणी आहे.









