Home गडचिरोली चामोर्शी ते हरणघाट खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा

चामोर्शी ते हरणघाट खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा

0
338

चामोर्शी ते हरणघाट खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा

चामोर्शी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांची निवेदनातुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :- चामोर्शी ते मुल रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले असल्याने वाहन धारक व सामान्य माणसाला आवागमन करताना मोठी दमछाक होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे तेथून वाहन काढताना तारेवरची कसरत वाहन चालकाला करावी लागत आहे. तरी पण या रस्त्याकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत आहे या रस्त्यावर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

करिता त्या रस्त्याचे काम तात्काळ दूरस्थ करावेत अशी मागणी येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या पदाधिकाऱ्यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुणाल काकडे यांना निवेदन देत मागणी केली आहे. सबब निवेदनाची दखल घेतली नाही तर अन्यथा आंदोलन करावे लागेल. असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे

चामोर्शी ते हरणघाट रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून त्या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी भरून असल्याने वाहन कुठून काढायचा हा प्रश्न निर्माण होत आहे तरी पण अद्याप दखल घेतली जात नाही याचे आश्चर्य वाटत आहे. त्या मार्गाने येणा-या जाणा-या लोकांना व शाळेकरी मुलांना सुध्दा नाहक नास सहन करावे लागत असून त्या खड्डेंमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी रस्त्याची दखल घ्यावी जर चामोशी ते हरणघाट या रस्त्याच्या कामाला सुरवात न झाल्यास शिवसेना वैद्यकिय कक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे . सदर निवेदनाची दखल घेण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग चे कुणाल काकडे सि.ई.ए ,संतोष बहुरे हि.ई.ए. दीपक सदूलवार संगणक कक्ष यांच्या कडे निवेदन सुपुर्द करण्यात आले.

त्यावेळी वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी चे तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवार उपप्रमुख चंद्रभुषण वालदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम गडचिरोली जिल्हा चामोर्शी विधानसभा सचिव संतोष कटारे विधान सभा शहरं प्रमुख शुभम चलाख सदस्य अंकुल फुलझले प्रशिक नंदेश्वर कार्तिक चौके विवेक दुधबडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!