MKCL (Maharashtra Knowledge Corporation Limited) चा रौप्य महोत्सव म्हणजेच २५ वर्षांचा प्रवास, हा एक अत्यंत गौरवशाली आणि प्रेरणादायी टप्पा
MKCL च्या रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
चामोर्शी, सुखसागर झाडे :- आज दिनांक २० ऑगष्ट रोजी.एम.के.सि.एल ला २५ वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याने गुरुकुल इंस्टिट्यूट येथे भव्य दिव्य रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मागील २५ वर्षांपासून MKCL ने ज्ञान, तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणुन ओळखले जाते. आजच्या पिढीतील खरा साक्षर व्यक्ती तोच असतो जो संगणकीय शिक्षण पूर्ण केले आहे, प्रत्येक क्षेत्रातील डिजिटल क्रांती, रोजगारक्षम कौशल्य विकास, आणि संधींच्या दारी नेलेली संकल्पना—या सगळ्यांचा गाभा MKCL च्या कार्यात पाहायला मिळतो.
या २५ वर्षांच्या प्रवासात, ‘Transformation through Empowerment’ ही MKCL ची संकल्पना फक्त घोषवाक्य न राहता, ती प्रत्यक्षात उतरलेली एक क्रांती ठरली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी MKCL च्या माध्यमातून शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेकडे वाटचाल केली आहे.
या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने, भूतकाळातील यशाचा गौरव करताना आपण भविष्यातील नव्या वाटचालीकडेही सकारात्मक दृष्टीने पाहूया. नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून MKCL पुन्हा एकदा भारतासाठी आदर्श ठरेल, याची खात्री आहे असे प्रतिपादन आपले विचार व्यक्त करताना वामन एन. किनेकर गुरुकुल कॉम्प्युटर अकॅडमी सेंटर चामोर्शी चे संचालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गण मोठ्या संख्येने उपस्थित होता.









