Home गडचिरोली मनिषा मडावी यांना विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सक्षम महिला पुरस्कार बहाल…

मनिषा मडावी यांना विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सक्षम महिला पुरस्कार बहाल…

0
249

मनिषा मडावी यांना विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सक्षम महिला पुरस्कार बहाल…

गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

✍️सुखसागर झाडे
गडचिरोली, 11ऑगस्ट
वीरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला सबळीकरण व सक्षमीकरण मेळाव्यात राज्य सरकार द्वारे “विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सक्षम महिला” पुरस्काराने गडचिरोली जिल्हातील मनिषा मडावी यांचा सन्मान करण्यात आला. 9 ऑगस्ट 2025 ला जागतिक आदिवासी दिनानिमित्त
गडचिरोली येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी यांना आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त महाराष्ट्र शासन द्वारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उईके यांच्या हस्ते गडचिरोली येथील रहिवासी मनीषा मडावी यांना सक्षम आदिवासी महिला या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आला मनीषा मडावी यांनी आजपर्यंत मिस इंडिया 2021 मिसेस महाराष्ट्र महाराष्ट्र 2022 सुपर मॉडेल रवी वॉक टायटल ऑफ इंडिया 2022, फिनिक्स पुरस्कार 2023, आदिवासी महिला नवरत्न पुरस्कार मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण पुरस्कार गडचिरोली गौरव पुरस्कार 2021आदिवासी समाज भूषण पुरस्कार 2022 कलारत्न पुरस्कार 2023 अगदी कमी वयात मनिषा ताई मडावी यांनी सदर पुरस्कार कर्तृत्वाने आपल्या नावे केलेले आहेत. आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा ही जगासमोर आली पाहिजे व आदिवासी कला परंपरा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली पाहिजे याकरिता त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आयोजित केलेला “कोया किंग” आणि “कोया क्वीन” स्पर्धेचे उत्कृष्टरित्या आयोजन केले व या आयोजनाचे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा दखल घेतली गेली या कार्याची दखल घेऊन आदिवासी समाजातील महिलांना प्रेरणा देण्याचे काम करत असल्याने आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त विरांगणा राणी दुर्गावती महिला, सबलीकरण सक्षमीकरण मेळावात कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीम बाग नागपूर येथे सक्षम आदिवासी महिला सन्मान व पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व या बद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, राहुल भाऊ झोडे, प्रवक्ता ग्यानेंद विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर,विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल,जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, बाळू भाऊ माडुरवार, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, विशाखा सिन्हा यांनी राज्य सरकारचे आभार मानले व मनीषाताई मडावी यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!