Home चंद्रपूर चोवीस तासानतंर वैभव पचारेचा नदीतुन मृतदेह मिळाला

चोवीस तासानतंर वैभव पचारेचा नदीतुन मृतदेह मिळाला

0
251

चोवीस तासानतंर वैभव पचारेचा नदीतुन मृतदेह मिळाला

 

घुग्घुस येथील वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून बुधवार, १० जुन रोजी सकाळी ११ वाजता वैभव भास्कर पचारे (२९ रा.प्रभाग क्रमांक १०,घुग्घुस) यांनी आपली दुचाकी पुलावर उभी ठेवुन व मोबाइल ठेवुन नदीत उडी घेतली.वैभव हा अविवाहित होता.

गुरुवारी (दि. 11 जून) शोधमोहीमेदरम्यान आढळून आला. या घटनेमुळे घुग्घुस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चंद्रपूर येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस व बचाव पथकाकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर गुरुवारी (दि. 11 जून) शोधकार्यादरम्यान वैभव भास्कर पचारे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घुग्घुस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) दाखल केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!