Home चंद्रपूर घुग्घुस शहरावर शोककळा, वर्धा नदीच्या पात्रात पाच तरूणांचा मृत्यू…

घुग्घुस शहरावर शोककळा, वर्धा नदीच्या पात्रात पाच तरूणांचा मृत्यू…

0
116

घुग्घुस शहरावर शोककळा, वर्धा नदीच्या पात्रात पाच तरूणांचा मृत्यू…


८ जुन २०२६ सोमवार रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घुग्घूस शहरातील इंदिरा नगर प्रभाग परिसरात राहणारे नकुल केळझकर, तन्मय पथाडे, सम्यक सोनटक्के, सन्नी आसपेल्ली, रोहित बोबडे हे पाच तरुण मित्र घरून वर्धा नदीत पोहायला निघाले व घुग्घुस-वणी स्मशानभूमीजवळील वर्धा नदीच्या चांदुर घाटावर पोहण्यासाठी गेले. नदीच्या कडेला या ५ तरुण मित्रांनी आपले कपडे नदीच्या काठाखाली काढून ठेवले व नदीत पोहण्यासाठी नदीच्या पात्रात गेले. पोहतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही तरुण मित्र नदीत बुडाले. सायंकाळपर्यंत ५ ही मुले घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी घुग्घूस पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी शोध सुरु केला असता पाचही तरुण मित्र नदीत पोहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच चंद्रपूर येथून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी ९ जुन सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास बचाव पथकाला तन्मय नवनाथ पथाडे याचा मृतदेह वेकोली पाण्याच्या टाकी संकुलाजवळ नदीपात्रात तरंगताना आढळून आला.
दरम्यान, इतर चार बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी नदीत मोठ्या प्रमाणावर पोलीस, बचाव पथके आणि स्थानिक नागरिकांकडून शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान नकुल भास्कर केळझळकर व सन्नी अशोक आरपेल्ली यांचे मृतदेह आढळून आले. उर्वरित दोघांचा शोध सुरू होताच अंदाजे ४ वाजता मिळाली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण घुग्घूस परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!