Home चंद्रपूर शेतकऱ्यांना तात्काळ डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी – शेती हंगामावर संकट

शेतकऱ्यांना तात्काळ डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी – शेती हंगामावर संकट

0
16

शेतकऱ्यांना तात्काळ डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी – शेती हंगामावर संकट

घुग्घुस व परिसरातील ग्रामीण भागात पावसाळ्याचे आगमन झाल्याने खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नागरणी, वखरणी, रोटावेटरद्वारे मशागत आदी शेतीची अत्यावश्यक कामे करत आहेत. मात्र परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी आवश्यक डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
विशेषतः शेतामध्ये काम सुरू असताना ट्रॅक्टरचे डिझेल संपल्यास शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास पेट्रोल पंप चालकांकडून नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅक्टर शेतामध्येच बंद पडत असून शेतीची कामे खोळंबली आहेत.

ठळक मुद्दे
पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला आहे.
नागरणी, वखरणी, रोटावेटर व इतर मशागतीसाठी ट्रॅक्टर हे प्रमुख साधन आहे.
परिसरातील पेट्रोल पंपांवरून शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात डिझेल मिळत नसल्याची तक्रार.
शेतामध्ये ट्रॅक्टर बंद पडल्यास कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जातो.
डिझेल अभावी शेतीची कामे रखडत असून पेरणी उशिरा होण्याची भीती.
शेतकरी मानसिक तणावाखाली असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणांना बाधा निर्माण होण्याची स्थिती.

शासनाकडे मागण्या
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी पेट्रोल पंपांवर प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे.
शेतीकामासाठी आवश्यकतेनुसार कॅनमध्ये डिझेल देण्याबाबत स्पष्ट निर्देश जारी करावेत.
महसूल, पुरवठा व कृषी विभागाने संयुक्तपणे परिस्थितीची पाहणी करावी.
खरीप हंगामात डिझेल पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करावा.
शेतकऱ्यांची गैरसोय करणाऱ्या संबंधितांवर आवश्यक कारवाई करावी.

“शासनाने व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन तात्काळ हस्तक्षेप करावा. अन्यथा डिझेल टंचाईमुळे खरीप हंगामावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये तसेच आवश्यकतेनुसार कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.” – सुधाकर बांदुरकर शेतकरी तथा माजी, उपसरपंच ग्रापं घुग्घुस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!