शहरातील बंद पडलेले RO प्लांट सुरू करून मंदिर प्रशासनाकडे हस्तांतर करा – नगरसेविका मोरपाका यांची निवेदनातून मागणी
घुग्घुस शहरातील बंद असलेले सर्व RO प्लांट सुरु करून मंदिर प्रशासनाकडे हस्तांतर करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून आली की, घुग्घुस नगर परिषद हद्दीतील विविध परिसरामध्ये उभारण्यात आलेले RO पाणी शुद्धीकरण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असून विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे.
घुग्घुस शहरातील सर्व बंद असलेले RO प्लांट तात्काळ सुरू करण्यात आल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन त्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच या RO प्लांटचे योग्य संचालन व नियमित देखभाल व्हावी यासाठी संबंधित RO प्लांटचे संचालन मंदिर प्रशासन (जय बजरंग हनुमान सेवा समिती, घुग्घुस) यांच्याकडे सोपविण्यात यावे. तरी आपण सदर बाबीचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करून घुग्घुस शहरातील बंद असलेले सर्व RO प्लांट तात्काळ सुरू करून त्यांचे संचालन व देखभाल मंदिर कॅमेटी कडे हस्तांतरित करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, आपण लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा करण्यात आली.









