Home चंद्रपूर पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी संख्या वाढवा – गटनेत्या मीनाताई मोरपाका

पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी संख्या वाढवा – गटनेत्या मीनाताई मोरपाका

0
123

पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी संख्या वाढवा – गटनेत्या मीनाताई मोरपाका

 

घुग्घुस येथील भाजप गटनेत्या व नगरसेविका मीनाताई चांद मोरपाका यांनी चंद्रपूर क्षेत्राचे लोकप्रिय मा. आ.किशोरभाऊ जोरगेवार तसेच दि. २९ मे शुक्रवार रोजी नगरपरिषदचे मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा सभापती यांना निवेदनातून मागणी करण्यात आले. की,घुग्घुस नगर परिषद अंतर्गत पाणीपुरवठा विभागामध्ये नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. पाणीपुरवठा यंत्रणा, पाईपलाईन दुरुस्ती, मोटार देखभाल तसेच तांत्रिक कामांसाठी फिटर पदाची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे.
घुग्घुस शहराची लोकसंख्या जवळपास 60,000 पेक्षा जास्त असून शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत नगर परिषद पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वेळा पाईपलाईन गळती, मोटार बिघाड तसेच तांत्रिक समस्या तात्काळ दुरुस्त होऊ शकत नाहीत.
त्यामुळे घुग्घुस शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभागामध्ये नवीन अस्थायी स्वरूपी फिटर पदावर भरती करण्यात यावी तसेच आवश्यकतेनुसार इतर कर्मचारी संख्या देखील वाढविण्यात यावी, तरी आपण सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी. यांच्यावर लवकरात लवकर लक्ष वेधून निर्णय घेण्यात यावे,या निवेदनावर घुग्घुस शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!