Home गडचिरोली गडचिरोली बस आगाराचा भोंगळ कारभार; प्रवाशांचे झाले बेहाल

गडचिरोली बस आगाराचा भोंगळ कारभार; प्रवाशांचे झाले बेहाल

0
70

गडचिरोली बस आगाराचा भोंगळ कारभार; प्रवाशांचे झाले बेहाल

 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगार व्यवस्थापकास दिली चेतावणी

 

 

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :- येथील बस आगारातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. दुपारी २.३० वाजता सुटणारी गडचिरोली–पोटेगाव बस नियोजित फ्लॅटफॉर्मवर न लावता अन्य ठिकाणी लावण्यात आली. यामुळे अनेक प्रवासी बसची वाट पाहत असतानाच संबंधित बस प्रवाशांना न घेता निघून गेल्याची घटना घडली. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी बस आगाराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच या प्रकाराबाबत आगार व्यवस्थापकाला जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रा. प्रशांत देव्हारे यांनी आगार व्यवस्थापकाला निवेदन देऊन भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य नियोजन व जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली. प्रवाशांना वेळेवर व योग्य माहिती देणे, बस नियोजित फ्लॅटफॉर्मवरच लावणे आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशीही त्यांनी सूचना केली.

दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे यांनी केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे,पोटेगावचे उपसरपंच प्रा. नरेश मोहूर्ले, प्रा. फुलझेले, बहुसंख्य प्रवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!