Home चंद्रपूर राजुरा उप जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत एरियर्स व वेतन तात्काळ न...

राजुरा उप जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत एरियर्स व वेतन तात्काळ न मिळाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

0
13

राजुरा उप जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत एरियर्स व वेतन तात्काळ न मिळाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

राजुरा:- राजुरा उप जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत एरियर्स व वेतन तात्काळ न मिळाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

उप जिल्हा रुग्णालय, राजुरा येथे अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर नागपूर मार्फत कार्यरत कंत्राटी कामगारांचे मागील अनेक महिन्यांचे वेतन व थकीत एरियर्स अजूनही मिळालेले नाहीत. रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांवरच उपासमारीची वेळ आली आहे.

कंत्राटी कामगार तथा झाशी राणी सांस्कृतिक मंडळ, बल्लारपूर चे अध्यक्ष श्री. रोहन कळसकर यांनी प्रशासनाला कडक व खुलेआम इशारा दिला आहे की, येत्या 3 दिवसांत सर्व कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन व एरियर्स अदा न झाल्यास, 1 मे 2026 पासून राजुरा उप जिल्हा रुग्णालयातील सर्व कंत्राटी कामगार बेमुदत कामबंद आंदोलन छेडतील.

रुग्णालयात स्वच्छता, वॉर्डबॉय, सिस्टर व इतर अनेक पदांवर काम करणारे हे कामगार अत्यंत तुटपुंज्या मानधनावर रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यातही वेळेवर पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन व संबंधित कंत्राटदाराची राहील, असा इशारा देखील श्री. कळसकर यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!