Home गडचिरोली लग्नकार्याकरीता लग्न मांडवाची परंपरा आजही कायम…

लग्नकार्याकरीता लग्न मांडवाची परंपरा आजही कायम…

0
59

लग्नकार्याकरीता लग्न मांडवाची परंपरा आजही कायम…

आदिवासी समुदायतील बहुतांश भागात लग्न मांडवाला पसंती

गडचिरोली, सुखसागर झाडे :- सध्या जिल्ह्यात सर्वत्र लग्नाचे बिगुल वाजत आहे. घरात लग्नकार्य असले कीं, नवीन मांडव टाकण्याची परंपरा अनेक शतकापासून सुरु आहे. परिवर्तनाची नांदी लागली आणी माणूस त्यानुसार बदलत जरी असला तरी काही बहुतांश भागात संस्काराचे दालन आजही कायम आहे. जिल्यातील संवेदनशील भागातील माडिया आदिवासी समुदायातील लोक त्यांच्या घरासमोर अंगणात मांडव बनवितात.
गडचिरोली जिल्ह्यात माडियासोबत अन्य आदिवासी समुदायतील लोक व इतर पारंपारीक वन निवासी समुदायही वास्तव्य करतात. तेही त्यांच्या घरासमोर मांडव बनवितात. चामोर्शी तालुक्यातील पूर्वेचा क्षेत्र,भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, धानोरा, कोरची या भागात मुबलक नैसर्गिक संसाधने असल्यामुळे हे सहज शक्य होतो.
घर जेवढा आकाराचा असेल जवळपास तेवढाच आकाराचा मांडव असतो. मांडव लाकूड आणि बांबूपासून बनवितात. मांडवाला वर छप्परसारखे बांबू लावतात. बांबूच्या वर सिंधीचा गवत टाकतात. त्यामुळे ऊन्हाळ्यात मांडवावाच्या खाली थंडगार राहतो.
हा मांडव बहुउद्देशीय आहे घरासमोर मांडव नसेल तर घराला शोभा येत नाही असे इथे बोलले जाते. घरात कोणी पाहुणे आले तर सरळ घराच्या आत न जाता घराच्या समोरील मांडवाखाली बसतात. याच मांडवाखाली छोटे मोठे बैठकाही होतात. उन्हाळ्यात या मांडवाखाली तसेच वर झोप घेतं असतात . आजूबाजूच्या घरातील मुले मित्र मिळून थेट या मांडवाच्या वर झोपत असतात . मांडवाच्या वर झोप येईपर्यंत कोणीतरी कथा गोष्ट सांगायचा एकाने गोष्ट सांगायचा, बाकीच्यांनी इंगो अले रा…! असे म्हणत बाकी त्याची गोष्ट ऐकत आहोत हे जाणीव करून द्यायचा. इंगो अले रा… असा साद बाकीच्याकडून आला नाही तर गोष्ट सांगणारा समजून जातो की सर्व झोपले आहेत मग तोही कथा गोष्ट सांगणे थांबवितो व झोपतो.
अंगणातील या मांडवाच्या वर मोहाचे फुले, चारोळी, पत्रावळी बनविण्यासाठी जंगलातून आणलेले पाने, मासे, मटन इत्यादी वळवीतात. मासे, मटन मांडवाच्या वर वाळविण्याचे कारण म्हणजे तिथे त्यांचे पाळीव जनावरे पोहचू शकत नाहीत. शिवाय दिवसभर कडक ऊन असतो.
मुलाच किंवा मुलीचं लग्नकार्य करायच असेल तर पूर्णपणे नविन मांडव बनवितात. सर्व जुने मांडवाचे सामान काढून टाकतात व नविन सामान लावतात. लग्नाच्या एक किंवा दोन दिवसापूर्वी ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरी गावातील सर्व लोक मिळून मांडव बनवून देतात. ज्या दिवशी मांडव बनवितात त्या दिवशी सर्व गावाकऱ्यांना जेवण असतो. या जेवणाला माडिया आदिवासी “मंडा कुडपी” असे म्हणतात. मांडव बनविलेल्या दिवशी गावातील सर्व जण त्या मांडवाखाली नाचतात.
लग्नाच्या दोन्ही महत्वाच्या दिवशी गावातील सर्व जण त्यांना नेमून दिलेल्या कामात व्यस्त असतात. या दोन्ही दिवशी त्यांना नाचगाणे करता येत नाही. म्हणून मांडव बनविलेल्या दिवशी गावकरी मनसोक्त नाचतात, गातात. अशाप्रकारे आदिवासीच्या जीवनात मांडवाचे महत्वपूर्ण स्थान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!