Home गडचिरोली नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत कुनघाडा रैयतवारी केंद्राचा डंका ; १० विद्यार्थी पात्र

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत कुनघाडा रैयतवारी केंद्राचा डंका ; १० विद्यार्थी पात्र

0
71

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत कुनघाडा रैयतवारी केंद्राचा डंका ; १० विद्यार्थी पात्र

चामोर्शी, सुखसागर झाडे
नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रैयतवारी केंद्राने दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
या केंद्रातील एकूण १० विद्यार्थ्यांनी नवोदयसाठी आपली पात्रता सिद्ध केली असून, संपूर्ण चामोर्शी तालुक्यातून एकूण ३० विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

​चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक केंद्रांमध्ये कुनघाडा रैयतवारी केंद्राने सर्वाधिक विद्यार्थी निवडून आणत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

*नवोदय साठी पात्र झालेले विद्यार्थी*
केंद्र शाळा कुनघाडा (रै.)
1.वृषभ रविंद्र कुनघाडकर
2.श्रीओम बाळकृष्ण मेश्राम
कन्या शाळा कुनघाडा (रै.)
1.स्वरा कोहरे
2.आयुषी रामटेके
3.अवनी सुरजागडे
4.शबुरी सुरजागडे
5.स्वरा कोठारे
जि.प.उच्च प्रा.शाळा गिलगाव
1.सांज विक्रांत चापुलवार
2.पुष्कर दिपक मडावी
जि.प उच्च प्रा शाळा नवेगाव रै 1. तन्मय प्रविण कोसरे अशा 10 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
तालुक्यात पात्र ठरलेल्या ३० विद्यार्थ्यांपैकी एकतृतीयांश विद्यार्थी एकट्या कुनघाडा केंद्रातील असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

​या सुवर्ण यशाची दखल घेत चामोर्शीचे गटशिक्षणाधिकारी (BEO) सुधीर आखाडे यांनी स्वतः कुनघाडा येथील केंद्र शाळा आणि कन्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले.

​”दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. कुनघाडा केंद्राने तालुक्याचा नावलौकिक वाढवला असून, इतर केंद्रांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठ आहे,” असे गौरवोद्गार सुधीर आखाडे यांनी यावेळी काढले.

​गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या यशामुळे यशस्वी विद्यार्थ्यांवर तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य दिशा मिळाल्यास काय चमत्कार घडू शकतो, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!