चामोर्शी 12 बीच्या पेपरला ChatGPT च्या मदतीन कॉपी
कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन शिक्षकासह एक शिपाई निलंबित
चामोर्शी, सुखसागर झाडे :- बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान प्रश्नांचे फोटो काडून चाटजिपिटी च्या माध्यमातून उत्तरे शोधून सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार चामोर्शी येथील जा. कृ. बोमनवार (केंद्र क्र. 0615) या केंद्रावर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बारावीच्या राज्यशास्त्र विषय पेपरदरम्यान सुरू असलेल्या या ढिसाळ कारभारावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी थेट कारवाई केली आहे. या प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर, कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल प्रा. महेंद्र वसंतराव बुर्लावार, सहा. प्राध्यापक तथा केंद्र संचालक, पर्यवेक्षक प्रा. सुशील रामचंद्र लांजेवार, शिक्षक महेंद्र बाबुराव किरमे व शिपाई सुरज प्रमोद केळझरकर या चौघावर परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याचा अधिनियम 1982 नुसार पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकाराबाबत चामोर्शीचे गट शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांनी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात आली. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.









