Home गडचिरोली सार्वजनिक शिव-भीम जयंती प्रबोधनात्मक महोत्सवाचे आयोजन

सार्वजनिक शिव-भीम जयंती प्रबोधनात्मक महोत्सवाचे आयोजन

0
70

सार्वजनिक शिव-भीम जयंती प्रबोधनात्मक महोत्सवाचे आयोजन

शिव-भीम महोत्सवाची 11 वर्षाची परंपरा अबाधित राखणार

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :- सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रबोधनात्मक सार्वजनिक जयंती महोत्सव बाजार चौक चामोर्शी येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.
संत तुकाराम महाराज , संत रोहिदास महाराज , संत सेवालाल महाराज , संत गाडगे महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन

उच्च न्यायालय संभाजीनगरच्या प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. वैशाली डोळस यांनी उपस्थिताना संबोधित करताना म्हटले कीं, संतांचे कार्य, त्यागाचा इतिहास वाचन करून भावी सृजनशील, संस्कारमय जीवन घडवावे. आजच्या युगात शिवराय घडवायचे असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हावे आणि त्यासाठी घरातील पुरुषांनी शहाजीराजे होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच पुस्तकांचे वाचन अतिशय महत्वाचे आहे. नव्या पिढीला स्वतःचा विकास करायचा असेल तर महान महामानवांचे विचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या संविधानाने स्त्री- पुरुष समानतेच हक्क आपल्याला दिलेले आहे.

पोलीस निरीक्षक डोंब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हटले कीं, फक्त महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून चालणार नाही तर महामानवाचे, संतांचे,छत्रपती शिवरायांचे विचार आपण जोपासले पाहिजे. त्यांचे विचार आत्मसात करून नव्या पिढीने जास्तीत जास्त वाचनाकडे आपले लक्ष वेधले पाहिजे. नागरिकांना प्रबोधनात्मक मोलाचं मार्गदर्शन केलं. या महोत्सवाला उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा मा.जयश्रीताई वायलालवार , या कार्यक्रमाचे अध्यक्ष चामोर्शी पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक मा.दीपक डोंब हें होते. कार्यक्रमाला अतिथी गण म्हणून रोशनीताई वरघटे महिला व बाल कल्याण सभापती नगरपंचायत चामोर्शी, अमोल गं. गण्यारपवार नगरसेवक,पी. जी. सातार माजी गट विकास अधिकारी, व इतर मान्यवर उपस्थित होते.
संयुक्त जयंती महोत्सवाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे चामोर्शी नगर पंचायतसह ५५ इतक्या सामाजिक व जातीय संघटनांच्या वतीने मागील ११ वर्षापासुन हा जयंती महोत्सव विविध नामवंत वक्ते व किर्तनकार यांच्या प्रबोधनाने आयोजित करून चामोर्शी नगरात सामाजिक बांधिलकी जोपासत सलोखा राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले जात आहे.

या कार्यक्रमाचे अतिशय सुरेख असं संचालन सौं. भारती तितरे मॅडम झाडीबोली साहित्य मंडळ शाखा चामोर्शी च्या अध्यक्षा यांनी उत्तमरित्या केलं.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक कविता गो. झाडें यांनी केलं तर
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव-भीम जयंती महोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
या महोत्सवाला चामोर्शी नगरातील व परिसरातील सर्व जनता मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!