Home गडचिरोली आंतरविद्यापीठ वुडबॉल स्पर्धेत पोर्णिमा मोरेश्वर राऊत हिची निवड

आंतरविद्यापीठ वुडबॉल स्पर्धेत पोर्णिमा मोरेश्वर राऊत हिची निवड

0
78

आंतरविद्यापीठ वुडबॉल स्पर्धेत पोर्णिमा मोरेश्वर राऊत हिची निवड

चामोर्शी, सुखसागर झाडे : स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, चामोर्शी द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
मागिल सत्रात सहा विद्यार्थिनींची निवड झाल्यानंतर या चालू वर्षीय सत्रात ही पोर्णिमा मोरेश्वर राऊत विद्यार्थिनींची ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
वूड बॉल या खेळासाठी निवड झाली. मध्यप्रदेश राज्यातील
मध्यचल प्रोफेशनल विद्यापीठ, भोपाळ येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वूडबॉल स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या मुलींच्या संघात महाविद्यालयाच्या कु. पोर्णिमा मोरेश्वर राऊत यांची दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, चामोर्शीचे संस्थापक/अध्यक्ष मा. अतुलभाऊ गण्यारपवार, संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य गण्यारपवार, महाविद्यालयाच्या प्राचार्य कु. शिल्पा रमेश काशट्टीवार, एन. आय. एस प्रशिक्षक प्रसाद ताजने, प्रभारी शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. नितेश सावसाकडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!