शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सुपीक जमिनीच्या संरक्षणासाठी आमचा लढा – आमदार मिलिंद नरोटे
जिल्हाधिकारी व भेंडाळा शेतकरी जन आंदोलन समिती पदाधिकारी यांची चर्चा ; पुढील कार्यवाही करिता निवेदन सादर…
गडचिरोली, सुखसागर झाडे
आज चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसर तसेच जयरामपूर व चक नंबर २ येथील शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी माननीय जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
भेंडाळा परिसरात प्रस्तावित असलेली MIDC आणि त्यासाठी होणारे सुपीक जमिनीचे संपादन यामुळे येथील शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. या जमिनी बारमाही ओलिताखाली असून त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे,त्यामुळेच स्थानिक ग्रामसभा आणि शेतकरी बांधवांचा या होऊ घालणारे एम. आय. डी. सी.प्रकल्पाला प्रखर विरोध आहे.
जनभावना लक्षात घेता, प्रशासनाने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि कोणत्याही प्रकारची सक्ती न करता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा.
अशी आग्रही मागणी आमदार मिलिंदजी नरोटे यानी जिह्वाधिकारी अविश्यात पंडा व शेतकरी जन आंदोलन समिती भेंडाळा चे पदाधिकारी यांच्या समवेत पत्राद्वारे व चर्चेतून केली आहे.
विकासाच्या नावाखाली बळीराजावर अन्याय होऊ देणार नाही, हीच आमची भूमिका असून आम्ही शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
जन आंदोलन समिती भेंडाळा अपेक्षित होऊ घालणाऱ्या एम. आय. डी. सी. प्रकल्प विरुद्ध शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी असून शांती नें शासन ठोस पाऊले तात्काळ निर्णय घेत नसेल तर क्रांतिकारी लढा उभारण्यात येईल, काही होऊ द्या कोणत्याही परिस्थिती मध्ये भेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा प्रखर विरोध्द केला जाईल असे ठाम मत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मांडले.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सविच रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा चामोर्शी ता.महामंत्री संजयजी खेडेकर, भाजयुमो चामोर्शी तालुकाध्यक्ष भुवनेश्वरजी चुधरी, सरपंच मोहर्ली सुधीरजी शिवणकर, भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते लच्चमाजी सिर्गावार परिसरातील शेतकरी उपस्थित होते.









