Home गडचिरोली मनरेगा योजना सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

मनरेगा योजना सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

0
111

मनरेगा योजना सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना हि शेतमजूर गोर-गरीब कुटुंबाची संजीवनी आहे.
आपल्या उद्योग विरहित जिल्ह्यात बहुतांश ग्रामीण भागात रोजगाराचे कोणतेच माध्यम नाही.
शेती हंगाम संपला कीं शेतकरी मजूर वर्ग रोजगारासाठी हवालदिल होत असताना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना 2005 पासून अमलात आणल्या गेली. मनेरगा च्या नावात कोणताही बदल नं करता हि योजना पूर्वीप्रमाणेच प्रभाविपणे व अविरत सुरु ठेवावी.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजूर यांना गावातच रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( मनरेगा ) ही योजना सुरू होती. मात्र केंद्रातील सरकारने या योजनेचे नाव बदलवून योजना बंद करण्याचा कुटील डाव करीत असून ही योजना पुर्ववत सुरू ठेण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजता तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. संबधित मागणी संदर्भात निवेदन तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना देण्यात आले .
यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर , कांग्रेस चे कार्यकर्ते सुमेध तुरे ,विजय लाड ,कविता भगत , प्रेमानंद गोंगले,अमर मोगरे ,रवींद्र पाल ,सुशिन शहा ,निकेश गद्देवार, पिपलदास सोयाम, प्रियंका भगत ,हिवराज लाटकर ,रामदास कुकुडकार ,अजय गेडाम, मुक्तेश्वर कोंडेकर ,प्रशांत आत्राम ,अमर जवादे,देविदास मांडवकर ,महादेव जवादे,प्रफुल बारसागडे ,हेमंत कोवासे ,राहुल नैताम ,सुभाष कोठारे ,यासह काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी शेतमजूर,नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!