Home गडचिरोली पोलीस मुख्यालय एकलव्य सभागृहात 31पोलीस जवानाना शौर्य पदक मानकरी यांना प्रशस्ती देत...

पोलीस मुख्यालय एकलव्य सभागृहात 31पोलीस जवानाना शौर्य पदक मानकरी यांना प्रशस्ती देत केला सन्मान

0
134

पोलीस मुख्यालय एकलव्य सभागृहात 31पोलीस जवानाना शौर्य पदक मानकरी यांना प्रशस्ती देत केला सन्मान

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते शौर्य पदक प्रशस्तीपत्र बहाल

 

गडचिरोली, सुखसागर झाडे

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात कसनसूर–बोरीया येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या एकूण 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांना शौर्यपदक प्राप्त झाले असून, मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 05 पोलीस उपनिरीक्षकांना गृह विभाग, महाराष्ट्र शासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. या अधिकारी व अंमलदारांचा पदोन्नती समारंभ मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते पार पडला.

यावेळी मा. पोलीस महासंचालकांनी शौर्यपदक व पदोन्नती प्राप्त अधिकारी व अंमलदार तसेच उपस्थित विशेष अभियान पथकातील जवानांशी संवाद साधत माओवादविरोधी अभियानाबाबत सविस्तर चर्चा केली. जवानांच्या अडचणी जाणून घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ते म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अधिकारी व जवानांचे बलिदान नेहमी स्मरणात राहील. अवघड परिस्थितीतही मोठे उद्दिष्ट समोर ठेवून प्रामाणिकपणे कार्य करावे.”

मा. पोलीस महासंचालकांनी सर्व पदोन्नती व शौर्यपदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून उपस्थित सर्वांचे मनोबल उंचावणारे मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!