Home गडचिरोली कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांचं स्वागत

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांचं स्वागत

0
99

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांचं स्वागत

विविध प्रलंबित मुद्यावर विचार विनिमय

चामोर्शी:सुखसागर झाडे
पंचायत समिती चामोर्शी येथे नव्याने रुजू झालेले प्रकाश लालासाहेब पोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) तथा गटविकास अधिकारी (गट ‘अ’) यांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि संविधान प्रत देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या उपस्थितीत शिक्षक संवर्गासह पंचायत समिती अंतर्गत इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडचणी यावरही चर्चा झाली.
त्याच प्रमाणे काही प्रलंबित मुद्द्यांवर लवकरच संघटनेसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन गट विकास अधिकारी पोळ यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या स्वागत प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव ओमप्रकाश साखरे, जिल्हा उपाध्यक्षा सविता उराडे, तालुका अध्यक्ष मोरेश्वर भैसारे, सचिव डॉ. सचिन कुळसंगे, कार्याध्यक्ष दादाजी शेडमाके, मार्गदर्शक प्रमोद उंदीरवाडे, राहुल गेडाम, देवानंद बोरकर, रत्नदीप साखरे, कोषाध्यक्ष रुपेश खेवले, सुधाकर गेडाम, अनिल मेश्राम, जितेंद्र मुसद्दीवार, रवी खेवले, सुनील खोब्रागडे, मच्छिन्द्रनाथ हिचामी, नीता खेळकर, अर्चना हाताळकर, धर्मेंद्र बुग्गावार, चांगदेव सोरते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!