Home गडचिरोली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात मोठया उत्साहात संपन्न…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात मोठया उत्साहात संपन्न…

0
113

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात मोठया उत्साहात संपन्न…

चामोर्शी, सुखसागर झाडे

चामोर्शी (3/जाने. 2026):- हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना व विध्यार्थी विकास विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. शिल्पा काशेट्टीवार मॅडम यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रा. मीरा वाघमारे, प्रमुख अतिथी एल. ए. भावना सूर,प्रमुख पाहुणे डॉ. बि. व्ही. धोटे.प्रा. कृणाल आंबोरकर, प्रा.नितेश सावसागडे, प्रा. दगडू गुडदे, प्रा.डि.यादव सर. प्रा. सुखसागर झाडे उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.प्रा. मीरा वाघमारे सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकून कालची महिलांची परस्थिती आणि आजच्या महिला मध्ये झालेला बद्दल यावर यांनी महिलांच्या मानसिक विकृती दूर सारून शिक्षनातून कशा प्रकारे आपला विकास साधता येतो याचे महत्त्व पटवून दिले. मार्गदर्शनातून “महिला सशक्त असल्यास संपूर्ण कुटुंब आणि समाज सशक्त होतो,” असे ते यावेळी बोलल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रा. शिल्पा काशेट्टीवार मॅडम यांनी महिलांनी स्वतःच्या पालकांचे नावं उंचवण्यासाठी जिवतोड मेहनत घेत अभ्यास करून शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्यास प्रथम प्राधान्य दिल्यास स्त्री सुद्धा कुटुंबाचे खंबीर आधारस्तंभ होऊ शकते.”

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रा. सुखसागर झाडे यांनी विशेष चालबद्ध सुरात सुरेख गीत सादर केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विध्यार्थिनींनी गीत तसेच भाषणातून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. फलक साखरे या विध्यार्थिनीने सावित्रीबाई फुलेंची रुपधारण करून त्यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादर करीत उपस्थित्यांचे जणू मन जिंकले.
कालच्या स्त्री ने आजच्या स्त्रियांकारिता केलेल्या कष्टाचे, फलित आजची महिला कशी सशक्त झाली याबाबत जागरूकता निर्माण करून, सशक्त समाजनिर्मितीच्या दिशेने एक समाजाची महिला विषयी सकारात्मक सोच निर्माण करण्यासाठी अतिशय उपयुक्त बाब म्हणून सावित्रीबाई च्या लेकीनी सावित्रीबाई फुलेंचा उदोउदो करीत रॅली काढून जनजागृतीची मोहीम राबवित त्यांना मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितेश सावसाकडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन कालेजच्या सावित्रीबाई च्या लेकीने केले. यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!