Home गडचिरोली शासकीय रेती डेपो ठेकेदारांच्या ताब्यात..?

शासकीय रेती डेपो ठेकेदारांच्या ताब्यात..?

0
256

शासकीय रेती डेपो ठेकेदारांच्या ताब्यात..?

वाघोली डेपोवर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

प्रशासन रेती माफियांवर अंकुश लावणार का❓याकडे लागले स्थानिक जनतेचे लक्ष

चामोर्शी-सुखसागर झाडे

चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदी घाटाचा शुभारंभ चामोर्शी चे तहसीलदार यांच्या शुभहस्ते नुकताच पार पाडला गेला.या डेपो चा एकमेव उद्देश म्हणजे रखडलेल्या घरकुल बांधकाम लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देणे परंतु मौजा वाघोली येथील शासकीय रेती डेपो सध्या ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.
शासकीय डेपो असतानाही येथे एकही शासकीय कर्मचारी नियमित हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
परिणामी रेती उपसा, विक्री तसेच माती व मुरूम उत्खननावर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही.
ठेकेदारांच्या मर्जीप्रमाणे उत्खनन करून रेती, माती व मुरूम सर्रासपणे विक्री केली जात असून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या घरकुल व इतर बांधकामांसाठी रेती उपलब्ध असताना, अवैध रेती तस्करदारीचे बेनाम बादशहा सारखे अवैध रेती शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून डेपोमधील रेती परगावी खुलेआम विकली जात असल्याचे असल्याचे नागरीकांना कडून बोलल्या जात आहे.
शासकीय डेपो असूनही प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्यामुळे गैरव्यवहार बिनधास्त सुरू आहेत. संबंधित यंत्रणांनी वेळेवर दखल न घेतल्यास हा महसूल बुडीत घोटाळा आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
मौजा वाघोली रेती डेपो शासकीय डेपो असताना शासकीय कर्मचारी कुठलाही नाही रेती उपसा करणे रेती विक्री माती व मुरूम उत्खन न करणे असा डेपो ठेकेदाराचा मनमान सरकारचा दुर्लक्ष शासकीय डेपो असून शासकीय कर्मचारी कुठलाही तिथे हजर नाही ठेकेदारांनी जेव्हा म्हणला तेव्हा आपले मनमानीने उत्खनन करून रेती व मात मुरूम सर्रासपणे विकल्या जाते त्यामुळे कोट्यावधीत रुपयाची महसूल बुडीत स्थानिक च्या घरकुल व इतर बांधकामाला रेती उपलब्ध नाही डेपो मधून बाहेर गावाला रेती विकल्या जात आहे प्रशासनाचा डेपोकडे कुठलेही लक्ष नाही.
वाघोली रेती डेपोवर तातडीने शासकीय कर्मचारी नियुक्त करून चौकशी व कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!