Home गडचिरोली स्व. गीता ताई हिंगे यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

स्व. गीता ताई हिंगे यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

0
116

स्व. गीता ताई हिंगे यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

खा. डॉ. अशोक नेते यांची गडचिरोलीत हिंगे परिवारास सांत्वन भेट

गडचिरोली, सुखसागर झाडे

गडचिरोली:- भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोली येथे स्व. गीता ताई सुशील हिंगे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या परिवाराची आस्थेने विचारपूस केली. अचानक झालेल्या या शोकांतिका प्रसंगात त्यांनी परिवाराला सांत्वन देत “दुःखाच्या या क्षणी आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा शब्दांत मनापासून संवेदना व्यक्त केल्या.

दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण अपघातात गीता ताई हिंगे यांचे आकस्मिक निधन झाले. त्या भाजपा महिला मोर्चा महामंत्री, विश्व आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी पक्ष—प्रदेश महिला उपाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्यरत होत्या. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय आणि सेवाभावी क्षेत्रात अपरिमित अशी पोकळी निर्माण झाली आहे. प्रत्येक घटकात सक्रीय असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हा धक्का सर्वांसाठी ह्रदयविदारक ठरला आहे.

डॉ. नेते यांनी हिंगे परिवारातील सर्व सदस्यांना भेटून त्यांना धीर दिला.“ही वेदना अतिशय मोठी आहे; पण परमेश्वर आपल्याला दुःख सहन करण्याची शक्ती देवो. असे ते म्हणाले.

स्व. गीता ताईंच्या सामाजिक कार्याचा, त्यागाचा आणि नेतृत्वगुणांचा विशेष उल्लेख करत डॉ. नेते म्हणाले की,“ताईंचे आदर्श आणि सेवा-भावना हीच त्यांची खरी स्मृती आहे. त्या सर्वांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ राहिल्या आहेत आणि राहतील.” परमेश्वर स्व.गिता ताई च्या आत्म्यास चिरशांती प्रकाश आणि सद्गती देवो अशी मनोकामना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!