स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालयीन घोट चे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन वार्षिक क्रीडा महोत्सव मध्ये झळकले
विद्यार्थ्यांची मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी
चामोर्शी – सुखसागर झाडे
घोट : आंतर महाविद्यालयीन वार्षिक क्रीडा महोत्सव 2025 – 2026 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मॅरेथॉन स्पर्धा, चंद्रपूर येथे आयोजीत स्पर्धेत
स्व.जोगेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालय घोट.
येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले.
या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मा. अतुलभाऊ गण्यारपवार, संस्थेचे मार्गदर्शक श्री. अजिंक्य भाऊ गण्यारपवार, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रविण मडावी, श्री. भोलाराम मेश्राम, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा कर्मचारी वृंद यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन पर कौतुक केले.
*उत्कृष्ट विद्यार्थी स्पर्धा विजेते*
🎖️ रोशन पितांबर बोदलकार, बी.एस्सी. द्वितीय वर्ष
सुवर्ण पदक – 10,000 मीटर धावणे – वेळ : 34:14 सेकंद
रौप्य पदक – 3000 मीटर ट्रिपल चेस – वेळ : 10:41 सेकंद
रौप्य पदक – 21:97 हाफ मॅरेथॉन – वेळ : 1:08:43 सेकंद
सुवर्ण पदक – 5000 मीटर धावणे – वेळ : 16:13 सेकंद
🎖️ रोहन संजय भुरसे, बी.एस्सी. प्रथम
सुवर्ण पदक – 3000 मीटर तिहेरी धावांचा टप्पा – वेळ : 10:40 सेकंद
रौप्य पदक – 800 मीटर धावणे – वेळ : 2:04 सेकंद
रौप्य पदक – 1500 मीटर धावणे – वेळ : –
🎖️ यश राजु भांडेकर, बी.ए. प्रथम वर्ष
रौप्य पदक – 10,000 मीटर धावणे – वेळ : 34:58 सेकंद
रौप्य पदक – 21:97 अर्ध मॅरेथॉन – वेळ : 1:08:23 सेकंद
🎖️ 4×400 मीटर रिले संघ
रौप्य पदक – 4×400 मीटर रिले धावणे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून महेश वाढई यांनी अथक परिश्रम घेतले.
स्व. जागेश्वर सावकार कला व विज्ञान महविद्यालया वतीने अनेक उत्तम विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम आहे. मॅरेथॉन स्पर्धा विजेते विद्यार्थ्यांच्या यशाच्या श्रेयाबाबत सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.









