Home गडचिरोली मुरखळा चक्क छोट्याशा गावातील रजनीचे सीए फाउंडेशनच्या परीक्षेत घवघवीत यश

मुरखळा चक्क छोट्याशा गावातील रजनीचे सीए फाउंडेशनच्या परीक्षेत घवघवीत यश

0
250

मुरखळा चक्क छोट्याशा गावातील रजनीचे सीए फाउंडेशनच्या परीक्षेत घवघवीत यश

सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या रजणीची उंच भरारी रजनीला बनायचंय सीए

चामोर्शी l सुखसागर झाडे

गडचिरोली सारख्या अतीदुर्गम जिल्यातील चामोर्शी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मुरखळा चक्क (बल्लु) या छोट्याशा गावातील एका सामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेली कु.रजनी किशोर चलाख ही प्री.प्रायमरी शाळेपासूनचं चाणक्य,बुद्धिमत्तेची होती.
तिची अभ्यासवृत्ती कल्पकता , तर्कवृत्ती व अफाट विद्वत्ता जणू गुरुजनांना व पालकांना आकर्षीत करणारी होती. त्यामुळे ही मुलगी भविष्यात आई वडिलाच नाव रोशन करेल भविष्यात मोठ यश संपादन करेल यात काहीच शंका नाही.
हे भाकीत खुद न्यू माउंट कॉन्व्हेन्ट या शाळेचे संस्थापक दुर्योधन घोंगडे यांनी व्यक्त केले होते. आणि अखेर भाकित खरे ठरले हिने इयत्ता 12 वी (सी.बी.एस ई) परीक्षेत 94.20% गुण घेत पि.एल. श्री. जवाहर नवोदय विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवले असून सी ए फाउंडेशन च्या परीक्षेत तिने घवघवीत यश घेत पास झाली आहे. पुढे तिला सी.ए. बनायचे असून तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

रजनीचे pre- Primary शिक्षण न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट चामोर्शी इथे झाले. तर प्राथमिक शिक्षण निशिगंधा कॉन्व्हेन्ट इथे झाले.
शिक्षण चालू असताना तिला शाळेतील कुनघाडकर सर व आधी गुरुजनांचे तथा आई वडिलांचे योग्य मार्गदर्शन लाभले.
तिची जवाहर नवोदय विद्याल घोट इथे निवड झाली इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी पर्यंतवे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे झाले.
सुरुवाती पासूनच सी.ए. बनण्याची इश्चा असणाऱ्या रजनीने पुढील शिक्षण घेण्याकरिता जवाहर न‌वोदय विद्यालय, अकोला येथे प्रवेश घेतला. यात तिने ।। वीत प्रथम क्रमांक घेत आपल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली. नंतर 12 विमधे सातत्य टिकवत मेहनत घेवून 94:20% गुणासह प्रथम क्रमांक मिळविला व सी ए . करीताच्या सीए फाउंडेशन परीक्षेत सुधा उत्तम गुणांनी पास होत यश मिळवले आहे.
त्यामुळे तिचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व तिला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांना दिले आहे. तिची विद्वत्ता तिला निश्चितच यशाच्या उंच शिखरावर नेणार यात काहीच शंका नाही.
तिने आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना तिला पुढे काय बनायचंय यावर मला भविष्यात सीए बनायचंय अशी भावना व्यक्त केली असून त्याकरिता होणारी प्रथम परीक्षा सुद्धा पास झाल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!