Home चंद्रपूर घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीत पुष्पा रामटेके नगराध्यक्षपदाच्या चर्चेत…

घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीत पुष्पा रामटेके नगराध्यक्षपदाच्या चर्चेत…

0
447

घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीत पुष्पा रामटेके नगराध्यक्षपदाच्या चर्चेत…

 

सद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून यासाठी उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारण दबंग म्हणुन ओळख असलेली पुष्पा रामटेके या नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आल्या आहेत. शहर परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारी संदर्भात कोणत्याही पक्षानी तिकीट नाही दिली तरी आपण अपक्ष निवडणूक लढवावी असे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

६१ वर्षीय सौ. पुष्पा रामटेके या घुग्घुस प्रभाग क्रमांक ४ केमिकल प्रभाग येथे राहतात. त्या गेल्या २० ते २५ वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रियपणे सहभागी असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पंचायत समिती निवडणूक लढवली होती. त्यानंतर अपक्ष ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. अपक्ष उमेदवार अस त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र दशकापासून त्यांनी शहरातील सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पुष्पा रामटेके या स्वतःच्या मेहनतीने आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे युवकवर्गात लोकप्रिय आहेत. अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घुग्घुस शहरात त्यांच्या नावाची चर्चा वाढत असून त्या कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाकडून नाहीतर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुष्पा रामटेके निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या तर घुग्घुस नगराध्यक्ष पदासाठी रंगतदार लढत होणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!