Home गडचिरोली ऐतिहासिक क्षण! गडचिरोलीत ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण – शांती आणि विकासाकडे एक मोठे...

ऐतिहासिक क्षण! गडचिरोलीत ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण – शांती आणि विकासाकडे एक मोठे पाऊल

0
195

ऐतिहासिक क्षण! गडचिरोलीत ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण – शांती आणि विकासाकडे एक मोठे पाऊल

बंदुकीच्या जोरावर क्रांतीचे स्वप्ने बघणारे पोलीस प्रशासना समोर हतबल

 

​आज गडचिरोली जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. माओवादी चळवळीतील म्होरक्या भूपती (मल्लोजुला वेणुगोपाल) यांच्यासह ६१ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेत, आज गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले.

पोलिसांचे अभिनंदन : गडचिरोली पोलीस दल आणि C-60 जवानांनी अत्यंत शौर्याने आणि योग्य रणनीतीने केलेल्या कार्यामुळेच हा ऐतिहासिक दिवस पाहता आला. त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व : राज्याच्या गृह विभागाच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहीम अधिक प्रभावी झाली आहे, ज्यामुळे शांततेच्या मार्गावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने आत्मसमर्पण झाले आहे.

​या आत्मसमर्पणामुळे गडचिरोलीच्या नागरिकांना शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे नवे पर्व अनुभवण्याची संधी मिळणार आहे. आम्ही सर्वजण मिळून या प्रदेशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बंदुकीच्या जोरावर क्रांतीचे मागील अनेक दशका पासून स्वप्नें बघणाऱ्या जोडीदारांने म्हणजे पत्नी तारक्का ने शस्त्र खाली ठेवून गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण करून जीवनाचा नवा मार्ग स्वीकारला होता.
किर्र धनदाट जंगलातील आयुष्याची बरीच वर्ष काढलेले हे दाम्पत्य आता उतारवयात भूतकाळ बाजूला सारत जीवनाच्या नव्या टप्प्यावर आपल्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. बंदुकीच्या जोरावर कोणताही सशस्त्र संघर्ष या देशात कदापीही यशस्वी होवू शकत नाही.. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
आत्मसमर्पण करणाऱ्यानां नवजीवन व पुढील नव्या वाटचालीसाठी तसेच इतरत्र ६८ साथीदार यांना उपस्थित मान्यवरांकडुन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!