विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून सावध राहावे – उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले यांचे प्रतिपादन
श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन
गडचिरोली (कुरखेडा), सुखसागर झाडे
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे जिल्हा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या वतीने “सायबर सुरक्षा मास” अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा म्हणजे संगणक नेटवर्क आणि डेटाल अनधिकृत प्रवेश नुकसान किंवा गैरवापरापासून सुरक्षित ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यापासून बचाव व सायबर सुरक्षे संबंधी कायदे व नियमाचे पालन करावे यासंबंधी ऑनलाइन शोषण, डेटा चोरी, फसवणूक विषयी उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कोषाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये ,कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका आघाव यांनी सुद्धा सायबर गुन्हा संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी सायबर सुरक्षा मास कार्यक्रमाला आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव दोषहरराव फाये तसेच श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा चे प्राचार्य नागेश्वर फाये सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप पाटणकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमालाशशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.









